SEARCH THIS BLOG

only search this blog

Friday, 10 February 2012

घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

लागे चाहुल तयाची मन आतूर आतूर
उरी गोड थरथर, लाज करी चूर चूर
कुणी उकलले माझे आज गुपित गुपित
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर
तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर
गाणे गाई वारा तुझे माझ्या कानात कानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात

दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात
न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात..
- नावात काय आहे..!!!

शुभ रात्री मित्रांनो...!!!!

No comments:

Post a Comment