Pages

Saturday, 31 December 2011

प्रेमात उभे राहावे कि प्रेमात पडावे

प्रेमात उभे राहावे कि प्रेमात पडावे
काहींना काही सुचत नाही 
पण हे नक्की कि तिच्या किंवा त्याच्या शिवाय जगात काही दिसत नाही 

रात्र रात्र जागून काढतात (परीक्षेच्या वेळी झोपा लागतात)
तिने किंवा त्याने बोललेले एक न एक शब्द आठवणीत असते
पण गणिताचे सूत्र काही आठवत नाही

तिच्या साठी चंद्र तारे तोडून आणावे वाटतात
(घरी सिलेंडर साठी कोणी किती पण ओरडले तरी दुर्लक्ष करतात)

घरी पैशाचा हिशोब लावतात
पण तिच्या साठी किती खर्च केले त्याचा हिशोब कधी लागत नाही

तिला कधी सांगितले कि पाणी भरत जा
तर सांगते मला खूप अभ्यास आहे
पण तो नाक्यावर उभा असेन तर पाण्या व्यतिरिक्त पण चार फेर्या अधिक होतात

कधी अन्याया विरुद्ध लढायला हिम्मत नस्ते
पण तिच्या साठी सगळ्या जगाविर्रुद्ध जायला कुठून हिम्मत मिळते

प्रेम घडवते,प्रेम शिकवते
प्रेम समजावते , प्रेम जागृत करते
पण प्रेम सर्वनाशपण करते......!!!!

No comments:

Post a Comment