Pages

Sunday, 16 October 2011

फेस बुक लावणी

फेस बुक लावणी

फेस बुक मधे मी खात काढलय,बघा ना राया
माझी मैत्रीची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट ना राया..
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

तुमच्या खात्यावर पोरिंची गर्दी लई भारी
माधुरी,प्रिति,प्रियंकाची त~हा लई नारी
मला बी तुमच्या मंदी घ्या ना राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

अल्बम मधे म्या छान छान फोट बी लावलय.
नथ घालुन, नऊवारी नेसुन छानशी सजलेय
तुमची माधुरी,प्रिति,प्रियंका जळेल राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

रोज रोज स्टेटस मी अप डेट करीन
छान सुंदर फोटु मी अप लोड करीन
बघुन सार ,पारण फिटेल हो राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

तुमा संग रातच्याला चॅटींग करायचय
पहाट पत्तुर लॉग आऊट नाहि व्ह्यायचय
विचारनच माझी झोप उडाली हो राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

मिळुन दोघ आपण एक page काढु
प्रेमाच्या छान छान कविता बी लिहु.
फेसबुक गुलाबी करु यात ना राया
रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..
- फेसबुक सिंह

No comments:

Post a Comment